अकोला : अक्षय नागलकरांच्या हत्येचा उलगडा, चौघांना अटक
अकोला, 25 ऑक्टोबर (हिं.स.) :अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा अक्षय नागलकर नामक युवक बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. गेल्या 22 ऑक्टोबर पासून बेपत्ता युवक अक्षयचा शोध घेण्यात येत होता.. मात्र या प्रकरणाला आ
P


प


अकोला, 25 ऑक्टोबर (हिं.स.) :अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा अक्षय नागलकर नामक युवक बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. गेल्या 22 ऑक्टोबर पासून बेपत्ता युवक अक्षयचा शोध घेण्यात येत होता.. मात्र या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. अक्षय नागलकर याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पूर्व वैमानस्यातून हे मोठं हत्याकांड घडलं आहे.

गेल्या तीन दिवसांपासून अक्षयचे नातेवाईक आणि मित्रमंडळी दररोज डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये येऊन ठाण मांडून बसतात. प्रत्येक वेळेस फक्त “तपास सुरू आहे” एवढंच उत्तर मिळत असल्याने त्यांच्या मनात नाराजी आणि अस्वस्थता वाढली होती.. या प्रकरणात स्थानिक भाजप पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अक्षयला शोधण्याची मागणी केली होती.. अक्षय जिवंत आहे की त्याच्यावर काही अनर्थ ओढवला आहे याचा तरी उलगडा लवकर करावा, अशी आर्त मागणी अक्षयच्या वडिलांकडून केली जात होती. अखेर घडलं वाईटच अक्षय नागलकर याची त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.. एकूण आठ जणांनी अक्षयची हत्या केली.. तर पोलिसांनी यापैकी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. हत्येचं कारण पोलिसांनी जुना वाद सांगितलं आहे..

ऑक्टोबरच्या संध्याकाळी पाचच्या सुमारास अक्षयने आईला “स्वयंपाक करून ठेव” एवढंच सांगितलं आणि घरातून बाहेर पडला. पण त्यानंतर तो कधीच परतला नाही. संपूर्ण कुटुंब दररोज त्याच दाराकडे पाहत होतं, कधी तरी तो येईल या आशेने. मात्र झालं उलटंच अक्षयची अतिशय निर्घृणपणे हत्या करून त्याचा मृतदेह जाळून टाकण्यात आला. अक्षय आणि मारेकरी यांनी हत्येपूर्वी आरोपीच्या एका हॉटेल मध्ये जेवण केलं.. त्यानंतर अक्षयला चाकू भोसकून मारण्यात आले.. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपींनी अक्षयचा मृतदेह जाळून टाकला... अखेर या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर अक्षय ची हत्या करण्यात आल्याचे समोर आलं. या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande