
परभणी, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या सामायिक अत्याचाराच्या घटनेच्या नंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून स्वतः पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व त्यांच्या टीमने संपूर्ण परिसर पिंजून काढला.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एस.आय. टी.ची स्थापना केली असून यात 9 अधिकारी व 17 ठाणे अंमलदारांचा समावेश आहे.जिंतूर तालुक्यातील डोंगरतळा परिसरामध्ये सामूहिक अत्याचाराचे प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस यंत्रणेने या संदर्भामध्ये तपासाची चक्रे फिरवली. वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून सहा आरोपी आरोपींना गजाआड करण्यात आले. एका बाल गुन्हेगाराला रिमांड होममध्ये पाठविण्यात आले. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी डोंगरतळा शिवारात घटनास्थळाचा मागोवा घेतला व संपूर्ण परिसर पिंजून काढला. जे आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहे. त्यांनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत का? अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यांमध्ये या आरोपींचा समावेश आहे. या संदर्भातली चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एस.आय.टी. स्थापना केली आहे. या एसआयटीमध्ये नऊ अधिकारी असून सतरा ठाणे अंमलदारांचा समावेश आहे. जिंतूर तालुक्याच्या आतापर्यंतच्या इतिहासामधील सर्वात मोठा तपास हा असण्याची शक्यता आहे.दरम्यान या सामूहिक अत्याचार प्रकरणी आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहेदरम्यान अटक केलेल्या आरोपींनी त्या भागामध्ये यापूर्वी अशा प्रकारचे अनेक गुन्हे केल्याची चर्चा असल्याने पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी सुरू केली आहे. यामध्ये अनेक गुन्हे उघडकीस येणाची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान पोलिसाला गुंगारा देऊन फरार झालेला करण मोहिते याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तासगाव येथून अटक केली. आरोपीच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक संदीप गडदे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सिद्धेश्वर चाटे,राम पोळ ,नामदेव दुबे यांचा समावेश होता. तर एका बाल गुन्हेगारालाही एक नोव्हेंबरपर्यंत रिमांड होममध्ये ठेवण्यात येणार आहे.
या प्रकरणांमध्ये आरोपी पर्यंत पोहोचण्यासाठी व गुन्ह्याची उकल करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त जीवन बेनिवाल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडगे, बीड जमादार गुंगाने, वाघमारे, जिया खान पठाण, माणिक डुकरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सिद्धेश्वर चाटे, नामदेव दुबे, राम पोळ, महिला पोलीस कर्मचारी पुंगळे आदींनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis