
परभणी, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।
सेलू तालुक्यातील पार्डी लंगे (ता. सेलू) येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चारठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वर राठोड, रा. पार्डी लंगे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, नेहमीप्रमाणे त्यांनी आपली स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच 22 एएल 6016) घरासमोरील अंगणात उभी केली होती. मात्र, सकाळी उठल्यानंतर मोटारसायकल घरासमोरून गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध घेतला, परंतु दुचाकीचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. याप्रकरणी त्यांनी चारठाणा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रामकिशन कोंडरे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis