
सोलापूर, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। शहर पोलीसांनी सीईआयआर पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करुन सोलापुरातून गहाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे 46,20,000 रु. चे एकूण 231 मोबाईल हॅन्डसेट हस्तगत केले. या मोबाईल मालकांचा शोध घेऊन ते परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.केंद्र शासनाच्या दुरसंचार विभागाद्वारे गहाळ झालेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल हॅन्डसेटची माहिती मिळण्यासंदर्भात सीईआयआर पोर्टल सुरु करण्यात आले आहे. सदरील पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर शहरातून गहाळ झालेल्या मोबाईल हॅन्डसेटची माहिती प्राप्त करुन घेवून त्यांचा शोध घेण्यासाठी शहर पोलीसांची विविध पथके परजिल्ह्यात व परराज्यात पाठविण्यात आली होती.सदरील तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सीईआयआर पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे अतिशय कुशलतेने तपास करून गहाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे 46 लाख 20 हजार रुपयांचे एकूण 231 मोबाईल हॅन्डसेट हस्तगत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड