अकोला : रस्ता प्राधिकरण च्या विरोधात रस्ता रोको आंदोलन
अकोला, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : मुर्तीजापुर ते अकोला मार्गाचे रोड व पूल बांधणीचे काम कित्येक महिन्यांपासून चालू होते. दहिगाव पासून ते गुडदीपर्यंत अर्धा किलोमीटर अंतरावर पाईप टाकलेले असून पाईप वरील बाजू अर्धवट बुजवलेली आहे. तसेच सांगळूद गावांमधील ब
प


अकोला, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : मुर्तीजापुर ते अकोला मार्गाचे रोड व पूल बांधणीचे काम कित्येक महिन्यांपासून चालू होते. दहिगाव पासून ते गुडदीपर्यंत अर्धा किलोमीटर अंतरावर पाईप टाकलेले असून पाईप वरील बाजू अर्धवट बुजवलेली आहे. तसेच सांगळूद गावांमधील बस स्टॅन्ड लगत असलेल्या पुलाला गेल्या दोन महिन्यापासून खोदून ठेवलेले आहे आणि गड्ड्यातील संपूर्ण माती रोडवर आणून टाकलेली आहे. अशात वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांचे अपघात या रस्त्यावर होत आहेत.अनेक नागरिक त्या ठिकाणी गाड्या स्लिप होऊन पडत आहेत पण गेल्या दोन महिन्यापासून बांधकाम विभागातील कर्मचारी त्या पुलाच्या इकडे फिरून सुद्धा पाहत नाहीत.अशात या कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने सांगळूद येथे रस्ता रोको आंदोलन सांगळूद येथे करण्यात आला आले. यावेळी 1 तास रस्त्यावर जाम झाला होता. आंदोलनाचा धसका घेऊन रस्ता प्राधिकरनाला आज जाग आली असून त्यांनी कामास सुरुवात केली आहे. 4 दिवसाचे आत जर अपघात प्रवण स्थळे ही दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी युवा आघाडी तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर यांनी दिला आहे. यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर, सिद्धार्थ शिरसाठ, शुभम वानखडे, अनीकेत हागे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष मंगला शिरसाठ,बाळू घाटाळे, विजय शिरसाठ, शिलू वानखडे,आनंद खंडारे, प्रदीप इंगळे, आकाश जाधव, आकाश दामोदर, विश्व्जीत इंगळे, रोशन राणे, जितेंद्र खंडारे,दिलीप शिरसाठ, सचिन शिरसाठ आदी दहिगाव, धोतर्डी, वरोडी येथील नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande