परभणी : शिवसेनेचा संघटन मजबुतीवर भर
परभणी, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : शिवसेना लोकसभा मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिक व पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन नवीन पदवाटप करण्यात आले. बैठकीत संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार आणि जनसंपर्क अभियानाबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस शिवसेना संपर्क
शिवसेनेद्वारे संघटन मजबूत करण्यावर भर : शिवसेना लोकसभा मध्यवर्ती कार्यालयात बैठक; नवीन पदवाटप


परभणी, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : शिवसेना लोकसभा मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिक व पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन नवीन पदवाटप करण्यात आले. बैठकीत संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार आणि जनसंपर्क अभियानाबाबत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीस शिवसेना संपर्कप्रमुख माजी खासदार सुरेशराव जाधव, माजी जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख आप्पाराव वावरे, माजी महानगरप्रमुख नितेश भैया देशमुख, नगरसेवक धम्मदीप रोडे, महिला जिल्हा संघटक चव्हाण, महाराष्ट्र राज्य व्ही.जी.एन.टी. उपाध्यक्षा चिंचाणे, तसेच शिवसेना विधानसभा प्रमुख अ‍ॅड. बोरीकर यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. बैठकीत संघटन मजबूत करण्यावर आणि कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande