
कोल्हापूर, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक)च्या नुकत्याच झालेल्या २२ व्या मासिक संचालक मंडळाच्या सभेत सन २०२५-२६ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. चेअरमनपदी जयदीप जयसिंगराव चौगले, तर व्हाईस चेअरमनपदी भरत परशुराम जाधव यांची सर्वानुमते निवड झाली.
ऑन. सेक्रेटरीपदी रणजित चंद्रकांत जाधव,आणि ट्रेझररपदी बदाम लक्ष्मण पाटील यांची पुनर्निवड झाली.
स्मॅक आयटीआय अध्यक्षपदी प्रशांत शिवाजीराव शेळके, आणि स्मॅक क्लस्टर अध्यक्षपदी सुरेश लक्ष्मण चौगुले यांची निवड करण्यात आली.
गेल्या पाच दशकांपासून उद्योगजगताच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने उद्योग उभारणीपासून सामाजिक जबाबदारीपर्यंत अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवले आहेत. सध्या संस्था आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असून, हा सुवर्ण प्रवास उद्योग, श्रम आणि सहकार्य यांचा गौरवशाली साक्षीदार ठरत आहे.
मावळते चेअरमन राजू तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला संचालक सुरेन्द्र सोहनमल जैन, अतुल आनंदराव पाटील, नीरज नरेंद्र झंवर, सचिन सदाशिव पाटील, शेखर श्रीकांत कुसाळे आदी उपस्थित होते.
नूतन चेअरमन जयदीप चौगले यांनी स्मॅकच्या उपक्रमांचा आढावा घेत, संस्था अधिक गतिमान आणि रचनात्मक बनविण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी उद्योगांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar