बहुप्रतीक्षित ‘पेट्रियट’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
मुंंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। बहुप्रतीक्षित पेट्रियट या सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर प्रेक्षक व चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आहे. १७ वर्षांनंतर पुन्हा मोहनलाल आणि ममूटी एकत्र पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात फह
बहुप्रतीक्षित ‘पेट्रियट’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित


मुंंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। बहुप्रतीक्षित पेट्रियट या सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर प्रेक्षक व चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आहे. १७ वर्षांनंतर पुन्हा मोहनलाल आणि ममूटी एकत्र पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात फहाद फासिल आणि नयनतारा सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

टीझरमध्ये मोहनलाल एका आर्मी ऑफिसरच्या गंभीर आणि ठाम भूमिकेत झळकताना दिसतो. फक्त 1 मिनिट 21 सेकंदाच्या या झलकीतच ताकद, भावनांचा स्फोट आणि ॲक्शनचा थरार अनुभवायला मिळत असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

मोहनलाल आणि ममूटी ही मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज जोडी अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यातच फहाद फासिल आणि नयनतारा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमाला अधिक आकर्षक बनवतात.

सोशल मीडियावर या टीझरची दखल कमल हसन आणि सलमान खान यांसारख्या सुपरस्टार्सनी घेतली असून, त्यामुळे पेट्रियट विषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. दमदार स्टारकास्ट, भव्य व्हिज्युअल्स आणि थरारक ॲक्शनमुळे पेट्रियट मल्याळम सिनेसृष्टीतील एक मेगा प्रोजेक्ट ठरणार आहे .

दिग्दर्शक : महेश नारायणन

कलाकार : मोहनलाल, ममूटी, फहाद फासिल, नयनतारा

कथा : देशभक्ती, गुप्तहेरगिरी आणि ॲक्शन

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande