निर्मात्याच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी; घेऊन येत आहेत दमदार वेब सीरीज
मुंबई, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। ‘मिर्जापूर’मधील कालीन भैया म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे पंकज त्रिपाठी आता अभिनयासोबत निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करत आहेत. त्यांची पहिली निर्मिती असलेली वेब सीरीज ‘परफेक्ट फॅमिली’ 27 नोव्हेंबर रोजी थेट यू
निर्मात्याच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी; घेऊन येत आहेत दमदार वेब सीरीज**


मुंबई, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। ‘मिर्जापूर’मधील कालीन भैया म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे पंकज त्रिपाठी आता अभिनयासोबत निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करत आहेत. त्यांची पहिली निर्मिती असलेली वेब सीरीज ‘परफेक्ट फॅमिली’ 27 नोव्हेंबर रोजी थेट यूट्यूबवर एका अनोख्या पेड मॉडेलसह रिलीज होणार आहे. 8 एपिसोडच्या या सीरीजला भारतातील लाँग फॉर्मेट कंटेंटच्या नव्या लाँचिंग स्ट्रॅटेजीचा भाग मानले जात आहे.

पंकज त्रिपाठी प्रथमच एखाद्या प्रोजेक्टची निर्मिती करत आहेत. ऑन-स्क्रीन दमदार अभिनयानंतर आता ते पडद्याच्या मागेही आपलं कौशल्य सिद्ध करण्यास सज्ज आहेत. ‘परफेक्ट फॅमिली’ ही हलकी-फुलकी फॅमिली ड्रामा सीरीज असून अजय राय आणि मोहित छब्बा यांनी तिचे क्रिएशन केले आहे. यूट्यूबवर साध्या व्हिडिओसारखी ती मोफत उपलब्ध नसेल; प्रेक्षकांना ती खरेदी करून पाहावी लागणार आहे.

पहिले दोन एपिसोड मोफत; उर्वरित पेड

भारतीय लाँग फॉर्मेट कंटेंटमध्ये हा एक रंजक प्रयोग मानला जात आहे. आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ थेट यूट्यूबवर रिलीज झाल्यानंतर हे दुसरे मोठे पाऊल मानले जात आहे. शोचे पहिले दोन एपिसोड मोफत उपलब्ध असतील, तर उर्वरित एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षकांना 59 रुपये द्यावे लागतील. या मॉडेलविषयी बोलताना पंकज त्रिपाठी म्हणाले, “हा मार्ग धाडसी आणि आवश्यक आहे.”

आपल्या या नव्या प्रवासाबद्दल पंकज त्रिपाठी अत्यंत उत्साहित आहेत. ते म्हणाले, “‘परफेक्ट फॅमिली’ माझ्यासाठी खूप खास आहे. याची कथा छान आहे आणि याच्या रिलीजची पद्धतही पूर्णपणे नवी व धाडसी आहे. यूट्यूब आता मोठ्या शोसाठीही एक मजबूत प्लॅटफॉर्म ठरला आहे, त्यामुळे मला ही दिशा योग्य वाटली.” पारंपरिक ओटीटीऐवजी यूट्यूबची निवड ही त्यांनी विचारपूर्वक घेतलेला निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले.

कलाकार व कथा

या सीरीजमध्ये दमदार कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. गुलशन देवैया, नेहा धूपिया, सीमा पाहवा, मनोज पाहवा आणि ‘जवान’ फेम गिरजा ओक गोडबोले महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कथा कर्करिया कुटुंब आणि त्यांचा मुलगा दानी भोवती फिरते. दानी हा अतिशय भावूक स्वभावाचा मुलगा आहे. एका दिवशी शाळेत त्याला झटका येतो. त्यानंतर कुटुंब त्याच्यासाठी थेरपी सुरू करतं आणि हळूहळू उघड होतं की घरातील प्रत्येकजण आपल्या-आपल्या समस्यांशी झुंज देत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande