सैफ अली खानने अंधेरीत 30.45 कोटी रुपये खर्चून खरेदी केले दोन ऑफिस स्पेस
मुंबई, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। बॉलीवूड कलाकार त्यांच्या चित्रपटांसोबतच लक्झरी लाइफस्टाइल, महागड्या गाड्या आणि आलिशान प्रॉपर्टीमुळे सतत चर्चेत असतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे पटौदी घराण्याचा नवाब, अभिनेता सैफ अली खान. नुकतंच सैफ याने मुंबईत आपल्या नव
सैफ


मुंबई, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। बॉलीवूड कलाकार त्यांच्या चित्रपटांसोबतच लक्झरी लाइफस्टाइल, महागड्या गाड्या आणि आलिशान प्रॉपर्टीमुळे सतत चर्चेत असतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे पटौदी घराण्याचा नवाब, अभिनेता सैफ अली खान. नुकतंच सैफ याने मुंबईत आपल्या नवीन ऑफिस सेटअपसाठी दोन कमर्शियल स्पेस खरेदी केले असून, त्यांची किंमत ऐकून सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत.

सैफ अली खान याने मुंबईतील पॉश परिसर अंधेरी येथे तब्बल 30.45 कोटी रुपये मोजून दोन कमर्शियल ऑफिस स्पेस खरेदी केले आहेत. ही प्रॉपर्टी मुंबईतील प्रीमियम बिझनेस लोकेशन ‘कनकिया वॉल स्ट्रीट’मध्ये स्थित आहे. नव्याने खरेदी केलेल्या या जागेचं एकूण क्षेत्रफळ 5,681 चौ. फूट असून, या डीलमध्ये सैफ याला सहा कार पार्किंग स्पॉट्सही मिळाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन औषध कंपनी एपिओर फार्मास्युटिकलकडून ही संपूर्ण प्रॉपर्टी सैफ अली खान याने खरेदी केली आहे. या व्यवहारासह सैफ याने आपल्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओमध्ये आणखी एक प्रीमियम जागा सामील केली आहे.

सैफ अली खानने याआधीही भारत आणि विदेशात अनेक प्रीमियम प्रॉपर्टीज खरेदी केल्या आहेत. त्याच्या भव्य जीवनशैली आणि गुंतवणुकीचे निर्णय अनेकदा चर्चेत राहतात आणि अंधेरीतील ही नवी खरेदी त्यांच्या दूरदर्शी निर्णयक्षमतेचं आणखी एक उदाहरण ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande