परिणीति चोप्राने दाखवली मुलाची पहिली झलक
मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। बॉलीवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा अलीकडेच पालक झाले आहेत. 19 ऑक्टोबर रोजी परिणीतीनं आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता आणि आता या कपलनं आपल्या छोट्या मुलाची पहिली झलक चाहत्यांसाठी श
परिणीति चोप्राने दाखवली आपल्या मुलाची पहिली झलक


मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। बॉलीवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा अलीकडेच पालक झाले आहेत. 19 ऑक्टोबर रोजी परिणीतीनं आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता आणि आता या कपलनं आपल्या छोट्या मुलाची पहिली झलक चाहत्यांसाठी शेअर केली आहे. या कुटुंबीय फोटोवर सध्या चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये परिणीति आणि राघव आपल्या बाळाला अतिशय प्रेमाने हातात घेतलेले दिसत आहेत. दोघांनी पोस्टसोबत लिहिले आहे, जलस्य रूपम्, प्रेमस्य स्वरूपम्… तत्र एव नीर. यासोबतच त्यांनी आपल्या मुलाचे नावही जाहीर केले—‘नीर’. परिणीतीनं सांगितलं की नीर या नावाचा अर्थ शुद्ध, दिव्य आणि अनंत असा आहे. त्यांच्या आयुष्यात आलेल्या या नव्या ‘अनंत थेंबाने’ त्यांच्या मनाला अपार शांतता आणि आनंद दिल्याचंही तिनं नमूद केलं.

परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाह 2023 मध्ये झाला होता. दोन वर्षांनंतर दोघांनी पालकत्वाचा आनंद अनुभवला आहे. ऑगस्ट महिन्यात परिणीतीनं आपल्या गर्भारपणाची घोषणा केली होती आणि काही महिन्यांनीच ऑक्टोबरमध्ये छोट्या नीरचं आगमन झालं.

कपल आणि त्यांच्या परिवारात या नव्या पाहुण्याच्या आगमनाने आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे, चाहत्यांनीही सोशल मीडियावरून मोठ्या उत्साहाने दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande