रहाटगाव “राख विक्री घोटाळा प्रशासनावर संगनमताचे आरोप
अमरावती, 22 नोव्हेंबर (हिं.स.)रहाटगाव येथील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील ऊर्जा प्रकल्पातून येणारी राख कंत्राटदारांकडून सर्रासपणे विक्री केल्या जात होती.दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या अवैध राख विक्रीतून कंत्राटदारान
रहाटगाव येथील “राख विक्री घोटाळाकंत्राटदारांनी लाटला लाखोंचा मलिदा  सहा दिवसानंतरही तक्रार नाही  प्राधिकरणासह प्रशासनावर संगनमताचे आरोप


अमरावती, 22 नोव्हेंबर (हिं.स.)रहाटगाव येथील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील ऊर्जा प्रकल्पातून येणारी राख कंत्राटदारांकडून सर्रासपणे विक्री केल्या जात होती.दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या अवैध राख विक्रीतून कंत्राटदाराने लाखो रुपयांचा मलिदा लाटला.रविवारी उघडकीस आलेल्या या घटनेला तब्बल सहा दिवस उलटले तरीही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण किंवा संबधीत यंत्रणेने या गंभीर घटनेची पोलीस तक्रार तर सोडाच मात्र दखल सुद्धा घेतलेली नाही त्यामुळे प्राधिकरणासह प्रशासनावर संगनमत असल्याचे आरोप होत आहे. दोन महिन्यांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराला स्थानिक वाहनमालकांनी उघडकीस आणल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. भाजपा ट्रान्सपोर्ट सेल चे जिल्हा संयोजक राजू चिरडे यांनी पोलीस स्टेशन ला लेखी तक्रार देखील सादर केली होती मात्र पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही.सुरुवातीला प्रति ट्रक १ हजार, नंतर २ हजार आणि सध्या थेट ४ ते ५ हजार रुपये अश्या वाढत्या दराने ही अवैध विक्री सुरू होती. दररोज २५ ते ३० ट्रक राख रहाटगाव प्रकल्पावरून थेट बाजारात विकली जात होती. जवळपास दोन महिने हा प्रकार निर्भयपणे सुरू राहिला असून, सरकारी संसाधनाची अशी उघड लूट होत असतानाही संबंधित विभाग, वाहतूक अधिकारी, राजमार्ग प्राधिकरण आणि स्थानिक यंत्रणा पूर्णतः मौन आहेत. वाहनमालकांनी या व्यवहाराचा भंडाफोड केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. परंतु प्रकरण उघडकीस येऊन सहा दिवस उलटले तरीही ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तक्रार नोंदवली गेली, ना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उलट, हे प्रकरण दाबण्यासाठी संगनमताने प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत.सरकारी मालमत्तेची अशी थेट व अवैध विक्री, कंत्राटदारांचा अनधिकृत नफा, आणि त्यावर प्रशासनाची शांतता हे सर्व मिळून या घोटाळ्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट होते. प्राधिकरणाकडून कारवाई न होणे, कंत्राटदारांवरील सौम्य भूमिका, आणि सहा दिवसांपासून सुरू असलेली संशयास्पद शांतता यामुळे “पाणी कुठेतरी मुरतेय का?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.रहाटगाव परिसरात या प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली असून, शासन संसाधनांची लूट उघडकीस आल्यानंतरही अद्याप कारवाई न झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका

संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीने ही राख स्थानिक व्यावसायिकांना रोखीने विकून मोठा आर्थिक डल्ला मारल्याचा आरोप होत आहे.शासनाला लाखो रुपयांचा चुना लावल्याप्रकरणी रहाटगाव उड्डाणपुलाचे बांधकाम करणाऱ्या दोन्ही कंपन्यांना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने काळ्या यादीत टाकावे अशी मागणी नांदगाव पेठ ग्रा पं. चे सदस्य बलविर चव्हाण यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande