
अमरावती, 22 नोव्हेंबर (हिं.स.)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ अभियानांतर्गत राज्यातील बस स्थानकांचे नवनिर्माण व सौंदर्यीकरणाचा संकल्प केला असून, या उपक्रमाचा प्रभावी प्रत्यय तिवसा एसटी बस स्थानकात पाहायला मिळाला. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी गडचिरोली येथील स्वच्छ सर्वेक्षण मूल्यांकन समितीने तिवसा बस स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध निकषांवर थेट मूल्यमापन केले. रंगसंगती, आकर्षक भित्तीचित्रे व हिरवाईने बदलले स्थानकाचे रूप सौंदर्यीकरणाच्या कामामुळे तिवसा बसस्थानकाचे स्वरूपच पालटले आहे. भिंतींवरील समाजप्रबोधनपर भित्तीचित्रे, आकर्षक रंगसंगती, स्वच्छ परिसर, कुंड्या आणि हिरवळ यामुळे बस स्थानक प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. प्रवासी सुविधा, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था व बस स्थानकातील एकूणच शिस्तबद्ध व्यवस्थापन यांचेही समितीने कौतुक केले.या स्थानकाचे कौतुक या पाहणीदरम्यान विभाग नियंत्रक अशोक कुमार, विभागीय अभियंता कुणाल सार, विभागीय वाहतूक अधिकारी योगेश ठाकरे, बस स्थानक प्रमुख प्रतीक मोहोड, रामभाऊ गुल्हाने, प्रवासी मित्र व सेवानिवृत्त मुख्याध्यापक शालिग्राम कांडलकर, पत्रकार सुनील घोरमाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी स्थानकातील सुधारणा, सुविधा आणि सौंदर्यीकरणाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
महामंडळ व सरकारचा पुढाकार कौतुकास्पद तिवसा बस स्थानकाच्या उभारणी, स्वच्छता आणि सुविधांच्या सक्षमीकरणासाठी महामंडळ आणि राज्य सरकारने घेतलेला पुढाकार हा ग्रामीण भागातील विकासाचा उत्तम नमुना असल्याचे मूल्यांकन समितीने स्पष्ट केले. या सर्व स्थानिकांचे योगदान उल्लेखनीय या संपूर्ण अभियानात अमरावती विभाग नियंत्रक निलेश बेलसरे व चांदुर रेल्वे आगार व्यवस्थापक जयंत झाडे यांचे मार्गदर्शन लाभले. बस स्थानक प्रमुख प्रतीक मोहोड आणि रामभाऊ गुल्हाने यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी सुधा वानखडे, मनोज मोरे, रतन खाकसे यांचेही विशेष योगदान राहिले.------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी