पाकिस्ताननंतर आता तुर्कीलाही बांगलादेशने दिला वादग्रस्त नकाशा
ढाका, 4 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशची अंतरिम सरकार सध्या भारताविरोधात आपली जमीन आणि साधनांचा वापर करण्याच्या तयारीत मोठ्या जोमाने गुंतली आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी आधी पाकिस्तानला आणि आता तुर्कीच्या संसदीय प्रतिनिधीमंडळाला “आर्
पाकिस्ताननंतर आता तुर्कीलाही बांगलादेशने दिला वादग्रस्त नकाशा


ढाका, 4 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशची अंतरिम सरकार सध्या भारताविरोधात आपली जमीन आणि साधनांचा वापर करण्याच्या तयारीत मोठ्या जोमाने गुंतली आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी आधी पाकिस्तानला आणि आता तुर्कीच्या संसदीय प्रतिनिधीमंडळाला “आर्ट ऑफ ट्रायम्फ” ही कलाकृती भेट दिली आहे. या कलाकृतीत भारताचा ईशान्य भाग बांगलादेशच्या भूभागात दाखवलेला आहे.

अलीकडेच मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकारी जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनाही हे वादग्रस्त नकाशे भेट दिले होते. बांगलादेश सरकारकडून हा नकाशा जाणीवपूर्वक प्रसिद्ध करण्यात आला असून, तो केवळ कला प्रदर्शन नव्हता तर आंतरराष्ट्रीय इस्लामी देशांना संकेत देण्यासाठी करण्यात आलेले पाऊल होते. अलीकडे मोहम्मद युनूस यांनी तुर्कीच्या प्रतिनिधीमंडळाला जे दस्तऐवज सुपूर्द केले आहेत, त्यात भारतासोबतच्या संभाव्य युद्धाच्या आणि त्यानंतरच्या कारवाईच्या योजना नमूद आहेत. या संपूर्ण घटनेवर भारत बारकाईने नजर ठेवून आहे.

या प्रकरणाची वेळ विशेष महत्त्वाची मानली जात आहे. दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये तुर्की विशेषतः इस्लामी देशांसोबत लष्करी सहकार्य, ड्रोन तंत्रज्ञान हस्तांतरण आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

तुर्कीने 2024 च्या सुरुवातीपासूनच बांगलादेशाशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले असून, त्यात संरक्षण उद्योग सहकार्य आणि तंत्रज्ञान गुंतवणुकीच्या ऑफर्सचा समावेश आहे. साल 1971 नंतर प्रथमच बांगलादेश आणि पाकिस्तान इतके जवळ आले आहेत. ढाका आता आयएसआय (पाकिस्तानची गुप्तचर संस्था) साठी नवीन अड्डा बनत आहे. गेल्या काही काळात पाकिस्तान आणि त्याचे समर्थित दहशतवादी संघटनांचे हालचाली बांगलादेशात वाढल्या आहेत.अलीकडेच पाकिस्तानी सैन्याचा एक वरिष्ठ अधिकारी बांगलादेशच्या दौऱ्यावर गेला होता.या बैठकीत आयएसआय चा कमांडर देखील उपस्थित होता, आणि दोन्ही देशांच्या गुप्तचर संस्था — आयएसआय आणि डीजीएफआय (फोर्सेस इंटेलिजेंस महासंचालनालय) — यांनी परस्पर गुप्त माहितीची देवाणघेवाण करण्याचा निर्णय घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande