
नाशिक, 4 नोव्हेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने नुकतीच जाहीर ् केलेली वीज दरवाढ मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. त्यामुळे राज्यातील घरगुती आणि औद्योगिक व्यवसायिक वापर करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य वीज मंडळ आयोगाने जुलै 2025 पासून राज्यामध्ये घरगुती व्यवसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विजेचे दर हे वाढविले होते.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती घरगुती ग्राहकांबरोबरच व्यवसायिक आणि विशेष करून उद्योग क्षेत्राला याचा मोठा दणका बसला होता. त्यामुळे उद्योजकांमध्ये मोठ्या नाराजीचे वातावरण पसरलेले होते या सर्व प्रश्नावरती राज्यातील उद्योजक हे न्यायालयात गेलेले होते. वीज मंडळाने आयोगाच्या शिफारशीनुसार लागू केलेल्या या वीज दरवाढीच्या परिणाम हा येणाऱ्या काही दिवसांमध्ये दिसण्याची शक्यता होती.त्यामुळे वीज मंडळा विरोधात असलेल्या या याचिकेवरती तातडीने सुनावणी सुरू होती या सुनावणीचा निकाल आज मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आला असून मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने जुलै 25 पासून लागू करण्यात आलेली वीज दरवाढ ही रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे तर घरगुती ग्राहकांनाही त्याचा फायदा होणार आहे. नाशिक मधील आयमा, निमा, यासह अन्य उद्योजक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केलेले आहे. तर या सर्व प्रश्नावरती नाशिक मधील वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV