नागेपल्ली : ख्रिस्ती मिशनरींच्या अनधिकृत वसतिगृहातून ९१ विद्यार्थ्यांना बाहेर हलविले
गडचिरोली: 4नोव्हेंबर(हिंस) : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील आशीर्वाद वसतिगृह येथील ९१ विद्यार्थ्यांना प्रशासनाने एकलव्य शाळा अहेरी तथा शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह खमनचेरु येथे हलविले आहे. सविस्तर माहिती अशी की नागेपल्ल
आशीर्वाद वसतिगृह


गडचिरोली: 4नोव्हेंबर(हिंस) : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील आशीर्वाद वसतिगृह येथील ९१ विद्यार्थ्यांना प्रशासनाने एकलव्य शाळा अहेरी तथा शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह खमनचेरु येथे हलविले आहे.

सविस्तर माहिती अशी की नागेपल्ली येथे मागील ११ वर्षांपासून आशीर्वाद हॉस्टेल नावाने मुले आणि मुलींचे वसतिगृह सुरू होते. या वसतिगृहाकडे चेन्नई येथील क्रिश्चन मिशनरी च्या एका संस्थेची नोंदणी आहे मात्र जिल्हा प्रशासनाच्या किंवा समाज कल्याण,जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय,धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयाची नोंदणी नाही त्यामुळे जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा आणि अहेरी चे उपविभागीय अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनात अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी,जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ज्योती कडू,बाल कल्याण समिती सदस्य दिनेश बोरकुटे,जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले,सामाजिक कार्यकर्ते जयंत जताडे,तालुका संरक्षन अधिकारी महेंद्र मार्गोनवार,क्षेत्र कार्यकर्ता निलेश देशमुख यांनी आशीर्वाद हॉस्टेल नागेपल्ली येथे धाड टाकत तपासणी केली आणि या आशीर्वाद हॉस्टेल महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही विभागाची नोंदणी नसल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे या अनधिकृत आशीर्वाद हॉस्टेल मधील ४८ मुली,४२ मुले यांना अहेरी चे प्रभारी पोलिस निरीक्षक मंगेश वळवी,महिला पोलिस उपनिरीक्षक करिष्मा मोरे व पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने प्रशासनाने पोलिस वाहनातून मुलांना एकलव्य शाळा अहेरी तथा मुलींना खमनचेरू येथे स्थलांतरित केले.

उद्या जिल्हा बाल कल्याण समिती या हॉटेल ची पाहणी करणार असून प्रशासन पुढे काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे या हॉस्टेल मधे वरच्या हॉल मधे चर्च असून तिथे दररोज प्रार्थना होत असते आणि तिथे ख्रिस्तामध्ये तुमची ओळख काय या विषयावर युवा मेळावा भरविण्यात आला होता यावेळी अनेक गावाचे नागरिक यावेळी इथे उपस्थित होते,क्रिश्चन धर्माचे अनेक पुस्तक,इतर साहित्य यावेळी विक्रीसाठी स्टॉल वर लावण्यात आले होते त्यामुळे विद्यार्थ्यांचे हॉस्टेल मधे क्रिश्चन धर्माचा युवा मेळावा कसा भरविण्यात आला,लहान मुलांसाठी क्रिश्चन धर्माचे पुस्तके कसे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ज्योती कडू

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

गडचिरोली

मागील ११ वर्षापासून नागेपल्ली येथे हॉस्टेल सुरू होते,या ठिकाणी आम्ही धाड टाकून दस्तऐवज तपासणी केली असता कोणतेही अधिकृत दस्तऐवज मिळाले नाही.जोपर्यंत या हॉस्टेल ला महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत तिथे आम्ही कोणत्याची विद्यार्थ्यांना तिथे राहू देणार नाही.

अरविंद वसावे

सेक्रेटरी इन्चार्ज

आशीर्वाद हॉस्टेल नागेपल्ली

आमच्याकडे चेन्नई फ्रेंड्स मिशनरी प्रेयर बँड या संस्थेची नोंदणी आहे.मात्र महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही विभागाची आमच्याकडे परवानगी नाही.मुलांना कोणताच त्रास होत नाही पहिल्या वर्गापासून बारावी पर्यंत इयत्तेत शिकणारे विद्यार्थी आमच्या आशीर्वाद हॉस्टेल ला राहतात.हॉस्टेल चे आणि युवा मेळावा यांचा काही संबंध नाही.-------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande