
लातूर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये लातूरमध्ये आपल्याला लढायचे आहे आणि जिंकायचे आहे, अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक मंत्री असे शेलार यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांना बळ दिले.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीमध्ये चांगले यश मिळवावे यासाठी परिश्रम घ्यावेत असे आवाहन देखील शेलार यांनी केले. लातूर दौऱ्यात भाजपा लातूर शहर व ग्रामीण जिल्ह्या ‘कार्यकर्ता संवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला व आगामी निवडणुकींबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी माजी मंत्री, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, अर्चनाताई पाटील चाकुरकर, माजी जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis