लातूर : केशवराज माध्यमिक विद्यालय येथे 'श्रीमद्भगवद्गीता सामूहिक पठण'
लातूर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी लातूर दौऱ्यावर असताना आज केशवराज माध्यमिक विद्यालय येथे ''श्रीमद्भगवद्गीता सामूहिक पठण'' कार्यक्रमास उपस्थिती राहून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. गीतेतील शाश
केशवराज माध्यमिक विद्यालय येथे 'श्रीमद्भगवद्गीता सामूहिक पठण'


लातूर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी लातूर दौऱ्यावर असताना आज केशवराज माध्यमिक विद्यालय येथे 'श्रीमद्भगवद्गीता सामूहिक पठण' कार्यक्रमास उपस्थिती राहून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

गीतेतील शाश्वत तत्त्वज्ञान आणि कर्मयोगाचा संदेश प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा असाच आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, नैतिकता आणि आत्मविश्वास दृढ होतो. या उपक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षकवृंदांचे मनःपूर्वक अभिनंदन मंत्री शेलार यांनी केले

यावेळी माजी मंत्री, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रवीण सरदेशमुख, भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, धनंजय तुंगीकर, शैलेश कुलकर्णी, प्राचार्य बाळासाहेब केंद्रे, उपप्राचार्य महेश कस्तुरे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande