
लातूर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। लातूरची कन्या सृष्टी सुधीर जगताप हिने न थांबता तब्बल १२७ तास नृत्य सादर करून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये आपले नाव नोंदवले आहे. या विलक्षण कामगिरीबद्दल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जींनी तिचा विशेष सत्कार केला. इतकेच नव्हे, तर सृष्टीने २४ तास लावणी नृत्य सादर करून ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्येही आपली नोंद केली आहे.
आज लातूर येथे आयोजित कार्यक्रमात सृष्टी जगताप हिचा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सत्कार केला व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. लातूर जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची ही अभिमानाची बाब असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis