परभणी जिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवांची गैरसोय; डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे प्रतीक्षा
परभणी, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या ग्रामीण आणि शहरी भागातील दिव्यांग बांधवांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दिव्यांग बोर्डाच्या तपासणीसाठी सकाळी साडेनऊ ते साडेबारा अशी वेळ न
परभणी जिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवांची गैरसोय; डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे तपासणीसाठी प्रतीक्षा


परभणी, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या ग्रामीण आणि शहरी भागातील दिव्यांग बांधवांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दिव्यांग बोर्डाच्या तपासणीसाठी सकाळी साडेनऊ ते साडेबारा अशी वेळ निश्चित असूनही संबंधित डॉक्टर तब्बल अकरा वाजेपर्यंत रुग्णालयात उपस्थित राहतात. त्यामुळे दिव्यांग बांधवांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

यामुळे तपासणीसाठी दूरवरून आलेल्या अनेक दिव्यांग बांधवांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. शिवाय, दिव्यांग बोर्ड कार्यालयात पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने अडचणी अधिकच वाढल्या आहेत.

या सर्व परिस्थितीमुळे दिव्यांग बांधवांकडून जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन आणि चिकित्सकांनी या बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे, डॉक्टर वेळेवर उपस्थित राहावेत तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande