पैठण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकावण्याचा निर्धार
छत्रपती संभाजीनगर, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। पैठण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकावण्याचा निर्धार शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला. माहेश्वरी भक्त निवास पैठण येथे पैठण नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैन
Q


छत्रपती संभाजीनगर, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। पैठण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकावण्याचा निर्धार शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला.

माहेश्वरी भक्त निवास पैठण येथे पैठण नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक आणि अंगीकृत संघटनांचा मेळावा खासदार संदिपान पाटील भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी मार्गदर्शन करून सविस्तर आढावा घेतला.

यावेळी येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वांनी शिवसेना आणि महायुती सरकारने घेतलेले निर्णय, महिलांसाठीचे निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवणे, निवडणूक प्रचार यंत्रणा, बूथ नियोजन विविधांगी विषयांवर मार्गदर्शन केले. यंदाच्या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande