
अकोला, 14 डिसेंबर (हिं.स.)।
पातूर तालुक्यातील वाशीम महामार्गावरील बोडखा गावाजवळ आज दुपारी चार वाजून तीस मिनिटांच्या सुमारास टिप्पर आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झाला. गिट्टी खदानातून मुरूम घेऊन जाणाऱ्या MH 30 BD 2682 क्रमांकाच्या टिप्परला पातूरहून वाशीमकडे जाणाऱ्या MH 13 CU 7135 क्रमांकाच्या एसटी बसने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील चंद्रप्रभा मनमोडे (७०, रा. वाशीम) आणि वर्षा अत्तरकर या दोन महिला जखमी झाल्या. स्थानिक युवकांनी जखमींना तात्काळ पातूर येथे उपचारासाठी हलवले. दरम्यान या बस मध्ये दहा ते वीस प्रवासी प्रवास करीत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. यावेळी पातूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. पुढील कारवाई सुरू केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे