
लातूर, 14 डिसेंबर (हिं.स.)।
लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी सज्ज झाली आहे. प्रशासकीय प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या 'अंतिम मतदार यादी' बाबत प्रशासनाने अधिकृत घोषणा केली आहे.
कधी होणार प्रसिद्ध?
उद्या, १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता ही यादी जाहीर केली जाईल.
तुमचे नाव कुठे पाहाल?
नागरिकांना ही यादी खालील ठिकाणी पाहता येईल:
महानगरपालिका संकेतस्थळ: mclatur.org वर ऑनलाइन स्वरूपात.
झोन कार्यालये: तुमच्या जवळच्या प्रभाग झोन कार्यालय A, B, C आणि D येथे प्रत्यक्ष स्वरूपात.
महत्त्वाचे आवाहन:
१ जुलै २०२५ च्या विधानसभा मतदार यादीनुसार प्रभागांचे विभाजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या राहत्या प्रभागाच्या यादीत नाव असल्याची खात्री करून घ्यावी, जेणेकरून मतदानाच्या दिवशी कोणतीही गैरसोय होणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis