
लातूर, 14 डिसेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्राचे 'इन्फ्रामॅन' आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या कल्याण-लातूर द्रुतगती महामार्गाला (Expressway) तत्वतः मंजुरी मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे लातूर आणि मुंबईमधील अंतर आता अवघ्या ४:३० तासांत पार करणे शक्य होणार आहे.
या महामार्गाचे वैशिष्ट्ये आणि फायदे:
प्रचंड वेग: ४४२ किमी लांबीचा हा मार्ग प्रवासाचा वेळ निम्म्याहून कमी करणार.
उद्योगांना बळ: मराठवाड्यात नवीन गुंतवणुकीचे व व्यापाराचे दरवाजे उघडणार.
शेतकऱ्यांचा फायदा: शेतीमाल थेट मुंबईच्या बाजारपेठेत जलद गतीने पोहोचणार.
रोजगार संधी: स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या लाखो नवीन संधी निर्माण होणार.
वेळेची व इंधनाची बचत: प्रवाशांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि स्वस्त होणार.
हा केवळ रस्ता नाही, तर लातूरच्या समृद्धीचा नवा महामार्ग आहे! विकासाची ही 'विमान झेप' लातूरच्या भविष्याला नवी दिशा देणारी ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis