मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा'चा शुभारंभ
मुंबई, 14 डिसेंबर (हिं.स.)मिशन ऑलिम्पिक २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि २०३४ पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी तयारीचे लक्ष्य ठेवून ‘प्रोजेक्ट महादेवा’ राबवण्यात येत आहे.या प्रोजेक्टमधून नक्कीच गुणवान खेळाडू मिळतील,अशी आशा मुख्
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा'चा शुभारंभ


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा'चा शुभारंभ


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लिओनेल मेसी


मुंबई, 14 डिसेंबर (हिं.स.)मिशन ऑलिम्पिक २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि २०३४ पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी तयारीचे लक्ष्य ठेवून ‘प्रोजेक्ट महादेवा’ राबवण्यात येत आहे.या प्रोजेक्टमधून नक्कीच गुणवान खेळाडू मिळतील,अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनातर्फे ‘प्रोजेक्ट महादेवा’ या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ वानखेडे स्टेडियम येथे करण्यात आला. ‘प्रोजेक्ट महादेवा’ हा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग या विविध संस्थांच्या विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी, अर्जेंटीनाचे माजी खेळाडू लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डिपॉल, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खासदार प्रफुल्ल पटेल, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतीय लोकप्रिय फुटबॉलपटू सुनील छेत्री, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार राहुल भेके, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्राचे)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, श्रीमती अमृता देवेंद्र फडणवीस, टायगर श्रॉफ, अजय देवगण, कार्तिक आर्यन, दिनों मोरिया, जिंदाल ग्रुपच्या पार्थ जिंदल, वेदना जिंदल यांनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘प्रोजेक्ट महादेवा ‘ हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा उपक्रम आहे, जो संपूर्ण राज्यात तरुण फुटबॉल मधील प्रतिभेचा (१३ वर्षांखालील) शोध घेवून फुटबॉल मधील उच्च दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती, परदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाची संधी दिली जाणार आहे. निवडलेल्या ६० खेळाडूंची (३० मुले, ३० मुली) पाच वर्षांची संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच अव्वल खेळाडू नक्कीच फिफा विश्वचषक मध्ये खेळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही: सचिन तेंडुलकर

भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणाले की, जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि त्यांचे सहकारी भारतात आल्याबद्दल आणि तेही मुंबईत आल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मानतो.मुंबईकरांनी ज्या प्रकारे या तिघांचे स्वागत केले ते अत्यंत अविस्मरणीय आहे. मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे आजचा क्षण हा अत्यंत अविस्मरणीय आहे. प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही. आज मला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सन २०११ च्या क्रिकेटच्या विश्वचषकाची आठवण झाली. आजचा क्षण हा सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. खेळामध्ये खेळाडूंना चिकाटी जिद्द अत्यंत महत्त्वाचे आहे. लिओनेल मेस्सी जागतिक दर्जाचा खेळाडू असून त्याच्यामध्ये संवेदनशीलता त्याच प्रकारे त्यांनी या खेळाडूंना दिलेले उत्तेजन अत्यंत महत्त्वाचे आहे. याबद्दल मी मेसीसे आभार मानतो आणि मेसीला व त्याच्या कुटुंबांला शुभेच्छा देतो.

लिओनोल मेस्सी या नावाचा वानखेडे स्टेडियमवर जल्लोष

जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने फुटबॉल प्रेमींना फुटबॉल प्रेक्षकांकडे भिरकवताच प्रेक्षकांनी लिओनोल मेस्सी या नावाचा जल्लोष केला. संपूर्ण मैदान मेस्सीच्या नावाने दुमदुमत होते. या वेळेला जागतिक फुटबॉलपटू लिओनल मेस्सीला सचिन तेंडुलकर यांच्या नावाची दहा नंबरची जर्सी सचिन तेंडुलकर यांनी भेट केली. जागतिक फुटबॉलपटू लिओनाल मेस्सीनेही सचिन तेंडुलकर याला फुटबॉल भेट दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागतिक फुटबॉलपटू लिओनोल मेस्सी यांनी जर्सी भेट दिली. पार्थ जिंदाल, वेदना जिंदाल यांनी जिंदाल ग्रुपतर्फे व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन मार्फत ७५ लाख रुपयांचा चेक प्रोजेक्ट महादेवाला दिला. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन मार्फत ९९ लाख ९९ हजार रुपयांचा धनादेश प्रोजेक्ट महादेवाला दिला.

सक्षम आणि शाश्वत फुटबॉल विकास व्यवस्था उभी राहणार

‘प्रोजेक्ट महादेवा’ हा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग या विविध संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धोरणात्मक दिशा, तळागाळातील सहभाग, व्यावसायिक फुटबॉल कौशल्य, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय पाठबळ मिळून राज्यात एक सक्षम आणि शाश्वत फुटबॉल विकास व्यवस्था उभी राहणार आहे.

प्रोजेक्ट महादेवा हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम

प्रोजेक्ट महादेवा हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, जो संपूर्ण राज्यात तरुण फुटबॉल प्रतिभेचा (१३ वर्षांखालील) शोध घेण्यासाठी आणि त्यांना विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत शिष्यवृत्ती, परदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाची संधी दिली जाणार आहे. निवडलेल्या ६० खेळाडूंची (३० मुले, ३० मुली) पाच वर्षांसाठी संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande