बांग्लादेश : निवडणूक आयोगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मागितली अतिरिक्त सुरक्षा
ढाका , 14 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये हिंसाचाराने पुन्हा एकदा उग्र स्वरूप धारण केले आहे. अलीकडेच काही बंदूकधाऱ्यांनी आगामी संसदीय निवडणुकीतील एका उमेदवारावर गोळीबार केला होता. या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेली व्यक्ती गेल्या वर्षी शेख हसीना यां
बांग्लादेशच्या निवडणूक आयोगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मागितली अतिरिक्त सुरक्षा


ढाका , 14 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये हिंसाचाराने पुन्हा एकदा उग्र स्वरूप धारण केले आहे. अलीकडेच काही बंदूकधाऱ्यांनी आगामी संसदीय निवडणुकीतील एका उमेदवारावर गोळीबार केला होता. या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेली व्यक्ती गेल्या वर्षी शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनातील एक प्रमुख नेता होती. या घटनेनंतर अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने आणि जाळपोळ सुरू झाली असून, त्यामुळे निवडणूक आयोगही चिंतेत सापडला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता निवडणूक आयोगाने (ईसी) आपल्या प्रमुख, इतर आयुक्त आणि अधिकाऱ्यांसाठी अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे.

सरकारी वृत्तसंस्थाने शनिवारी उशिरा रात्री दिलेल्या माहितीनुसार, “निवडणूक आयोगाने पोलिस महासंचालकांना (आयजीपी) पत्र लिहून मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी), निवडणूक आयुक्त (ईसी) आणि निवडणूक आयोग सचिवालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. 13व्या राष्ट्रीय निवडणुकीपूर्वी तळागाळातील कार्यालयांसाठीही अतिरिक्त सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे.” ही मागणी अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा आगामी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गेल्या गुरुवारी दक्षिण-पूर्वेकडील लक्ष्मीपूर आणि दक्षिण-पश्चिमेकडील पिरोजपूर येथील आयोगाच्या दोन कार्यालयांवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता.

या हिंसक घटनांनंतर बांगलादेशचे मुख्य निवडणूक आयुक्त भयभीत झाले असून, त्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा वाहनाची मागणी करण्यात आली आहे. सध्या त्यांच्या सुरक्षेसाठी एक पोलिस वाहन आधीच उपलब्ध आहे. आयोगाने चारही आयुक्त आणि वरिष्ठ सचिवांसाठी २४ तास पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. पत्रात सुरक्षाव्यवस्था वाढवणे “अत्यंत आवश्यक” असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांच्या 10 प्रादेशिक कार्यालये, 64 जिल्हा निवडणूक कार्यालये आणि 522 उपजिल्हा कार्यालयांमध्ये महत्त्वाची कागदपत्रे आणि निवडणूक साहित्य सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केले की आगामी संसदीय निवडणुका पुढील वर्षी 12 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. त्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी राजधानीतील एका मतदारसंघातून निवडणूक प्रचार सुरू करत असताना शरीफ उस्मान हादी यांच्यावर अगदी जवळून डोक्यात गोळी झाडण्यात आली, ज्यात ते गंभीर जखमी झाले. गृहविषयक सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जहांगीर आलम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि बेकायदेशीर शस्त्रांच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी सरकार ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’चा दुसरा टप्पा सुरू करणार आहे.” ही घोषणा शुक्रवारी करण्यात आली, जेव्हा मध्य ढाक्यातील बिजयनगर परिसरात निवडणूक प्रचार सुरू करत असताना शरीफ उस्मान हादी यांच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता.

उस्मान हादी हे 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार आहेत. डॉक्टरांच्या मते त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले असून, हादी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. युनूस म्हणाले, “संपूर्ण देश त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे आणि त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत.”

हादी हे गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनातील एक प्रमुख नेते होते. या आंदोलनांनंतर 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकार सत्तेवरून दूर झाली होती. गंभीर आजारी असलेल्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीसह जमात-ए-इस्लामी आणि विद्यार्थी नेतृत्वाखालील नॅशनल सिटिझन पार्टी (एनसीपी) यांनी हादी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande