
बीड, 15 डिसेंबर (हिं.स.)।
बीड जिल्ह्याच्या काही भागात बिबट्या सदृश्य प्राण्याने धुमाकूळ घातला असून यामुळे शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचा जीव घेतला जात आहे. विशेष म्हणजे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पाहणी दौरा सुरू केला आहे. गेल्या काही दिवसापासून बिबट्याने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे
फुलसांगवी शिवारात बिबट्याने मेंढपाळाचा घोडा व मेंढीचा फडशा पाडल्याची घटना घडली. या घटनेमुळे फुलसांगवीसह मार्करवाडी, शिरापूर गात, हाजीपुर-गाजीपूर व तरडगव्हाण या परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरडगव्हाण गावातील शिवारात शेतातील गोठ्यावर शेतकऱ्याच्या दोन करडांचा देखील फडशा बिबट्याने पाडल्याचा संशय वनविभागाने व्यक्त केला आहे. घटनास्थळी बिबट्यासदृश्य प्राण्याच्या उपस्थितीचे ठोस पुरावे आढळून आले
दोन ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे परिसरात बिबट्याचा वावर असण्याची शक्यता निर्माण झालेले असून परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी व एकट्याने व लहान मुलांनी रात्री अपरात्री बाहेर पडणे टाळावे असे वन विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे
सलग घडणाऱ्या या घटनांमुळे नागिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis