
बीड, 18 डिसेंबर (हिं.स.)। गेवराई येथे नगर पालिका मतदानाच्या दिवशी झालेल्या पवार- पंडित गटातील राड्यात दाखल गुन्ह्यात कलम वाढल्यानंतर बाळराजे पवार यांच्यासह पाच जणांना गेवराई पोलिसांनी अटक केली होती.एक दिवसाच्या पोलिस कोठडी नंतर त्यांना न्यायालयीन कोठडी झाली. न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला आहे
गेवराईत नगर पालिका निवडणुकीच्या दरम्यान बुथ क्रमांक १० वर शिवराज पवार व पृथ्वीराज पंडित या दोघांमध्ये वाद झाला होता. यातून बाळराजे पवार यांनी थेट माजी आ. अमरसिंह पंडितांच्या घरी जाऊन त्यांच्या स्विय सहायकाला मारहाण केली होती. त्यानंतर जयसिंह पंडित, पृथ्वीराज पंडित हे पवार यांच्या घराकडे गेले होते. माजी आ. लक्ष्मण पवार व जयसिंह पंडित एकमेकांवर धावून गेले होते. यावेळी दगडफेकही झाली होती. या प्रकरणात पोलिसांनीच गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर स्वीय सहायक डावकर यांच्या जबाबामुळे गुन्ह्यात कलम वाढ झाली होती. गंभीर कलम लागल्याने बाळराजे पवार यांना अटक केली गेली होती. एक दिवसाची कोठडी सुनावली गेली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. लगेच पवार यांच्याकडून जामीनासाठी अर्ज केला गेला. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने जामीन मंजूर केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis