धनंजय मुंडे-अमित शाहांच्या भेटीमुळे राजकीय चर्चा
बीड, 18 डिसेंबर (हिं.स.)।माजी मंत्री आमदार धनंजय मुंडें यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे. माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जागेवर धनंजय मुंडे यांना मंत्री पद मिळेल काय कि
धनंजय मुंडे-अमित शाहांच्या भेटीमुळे राजकीय चर्चा


बीड, 18 डिसेंबर (हिं.स.)।माजी मंत्री आमदार धनंजय मुंडें यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे. माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जागेवर धनंजय मुंडे यांना मंत्री पद मिळेल काय किंवा बीड जिल्ह्यातून विजयसिंह पंडित यांना संधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचे अडचणीत आलेले मंत्रीपद, त्याच दरम्यान योगायोगाने माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेली भाजप नेते गृहमंत्री अमित शहा यांची भेट, यामुळे मंत्रीमंडळात मुंडेंचे कमबॅक होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यालाच मंत्रीपद द्यायचे झाले तर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचीही लॉटरी लागू शकते. त्यामुळे बीडच्या दुसऱ्या मंत्रीपदाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेले आ. धनंजय मुंडे हे या सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री झाले होते. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मुंडेंचे सहकारी वाल्मिक कराड यांना झालेल्या अटकेनंतर अगदी स्वपक्षीयांपासून अनेकांनी मुंडेंना मंत्रीमंडळात स्थान नको, असे म्हणून सुरुवातीलाच विरोध केला होता. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांना संधी मिळाली होती. दरम्यानच्या काळात अधिवेशनाच्या सुरुवातीलाच देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो लिक झाले. त्यानंतर जनक्षोभ तिव्र झाला. याच काळात मुंडेही आजारी पडले होते. त्यामुळे मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मंत्रीपद गेल्यापासून अनेक महिने धनंजय मुंडे फारसे सक्रीय नव्हते. त्याला वैद्यकीय कारणही होते. आता काही दिवसांपासून मुंडे पुन्हा सक्रीय झाले असून ओबीसींच्या प्रश्नावर ते आक्रमक होत आहेत. मंत्रीपद गेले तर ते पुन्हा मुंडेंना दिले जाणार का, याची चर्चा आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande