
अकोला, 19 डिसेंबर (हिं.स.)।
अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहर.सध्या बाळापुरमध्ये नगरपालिका निवडणूक रणधुमाळीने चांगलाच जोर पकडलाय. येथील राजकारणाचे वैशिष्ठ्य म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथील नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाच्या खतीब कुटुंबियांचा एकछत्री अंमल आहेय. मात्र,मधील काळात खतीब घराण्याच्या सत्तेला हादरा देत चार वर्ष सत्ता हिसकावून घेतली होती.एरव्ही आघाडी करून लढणाऱ्या सर्व पक्षांनी या ठिकाणी स्वबळावर मैदानात उडी घेतलीय. या ठिकाणी सर्व आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अकोला जिल्ह्यातील 80 टक्के मुस्लिम लोकवस्ती असलेलं बाळापुर हे शहर.पुरातन आणि ऐतिहासिक असलेल्या बाळापुर शहराची बाजारपेठ कधीकाळी विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जायची.याच शहरावर विविध शासकांनी भोगलेल्या सत्तेच्या आठवणी सांगणारा किल्ला आजही या शहराच्या प्राचीन वैभवाची साक्ष देत आहे.मुस्लिमबहुल असलेल्या बाळापुरची हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतिक असलेलं शहर अशीही दुसरी ओळख. आता बाळापूरच्या या निवडणुकीत तीन आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उबाटाचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार आणि आता वंचित बहुजन आघाडीचे नेते नतिकोद्दीन खतीब , वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार तथा भाजपचे नेते बळीराम शिरस्कार हे तिन्ही आजी-माजी आमदार आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी मैदानात उतरले आहे.1938 साली बाळापुर नगरपरिषदेची स्थापन झालीय. मात्र स्थापणेनंतरच्या जवळपास 61 वर्षांपासून येथील
सत्तेवर एकछत्री अंमल राहिलाय तो काँग्रेसच्या खतीब घराण्याचा. काँग्रेस सोबत एकनिष्ठ असलेल्या खतीब यांनी मागील विधानसभेत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतली. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नी उभ्या आहेत.अतिक्रमण धारकांचे घर कायद्याचा चौकटीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
बाळापुरच्या नगरपालिकेवरील खतीब घराण्याच्या एकछत्री अंमलाची बक्षिसी नतीकोद्दिन खतीब यांना विधान परिषदेवरील आमदारकीच्या रूपाने मिळाली होतीय.2001 ते 2007 या काळात ते विधान परिषदेचे आमदार होतेय.1946 पासून बाळापुर नगरपालिकेवर काही अपवाद वगळता सलग खतीब कुटुंबियांची सत्ता आहेय.याआधी सर्व निवडणुका नगरविकास आघाडीच्या आणि काँग्रेसच्या नावावर लढविलेल्या खतीब यांच्या पत्नी वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर या निवजणुकीत मैदानात आहे.शहराचा मोठा विकास केल्याचा दावा खतीब यांनी केला असला तरीही शहरात कोणताही विकास झाला नसल्याचा भाजपने म्हंटलं आहे.या निवडणुकीत भाजप , वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष , एमआयएम यांनी स्वबळावर आपले उमेदवार उभे केलेय.तर काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाकरिता उबाठाने पाठिंबा दिला आहे. भाजपनं याठिकाणी धनश्री अंबाडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलीये.तर मुस्लीमबहूल असलेल्या या शहरात निर्णायक शक्ती असलेल्या वंचित बहुजन आघाडीने रजिया खतीब यांना उमेदवारी दिली आहे.मुस्लीम - बौद्ध समिकरणाचा विचार करीत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला याचा फायदा होऊ शकतो असे मत व्यक्त केले जात आहे.तर मुस्लिम उमेदवार या ठिकाणी अधिक असल्याने मत विभाजनाचा फायदा भाजपला सुद्धा होऊ शकतो.
एकाच घराण्याच्या सत्तेतून बाळापुरच्या विकास प्रक्रियेत एक प्रकारचे साचलेपण आलेय. याच साचलेपणातून बाळापुर शहर विकासापासून कोसो दूर गेलेय. येत्या निवडणुकीत बाळापुरची जनता पुन्हा खतीब यांच्या घराणेशाहीला कौल देते, की परिवर्तनाची हाक देणाऱ्या विरोधकांना हे मात्र मतमोजणीपर्यंत गुलदस्त्यातच राहणारेय.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे