भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची शनिवारी अकोल्यात बैठक
अकोला, 19 डिसेंबर (हिं.स.)। अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने राज्याचे निवडणूक प्रभारी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे राज राजेश्वर नगरीमध्ये दिनांक 20 डिसेंबर शनिवार रोजी येत असून स्थानिक हॉटेल सिटी स्पोर्ट इथे मोजक्याच प्रमु
H


अकोला, 19 डिसेंबर (हिं.स.)।

अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने राज्याचे निवडणूक प्रभारी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे राज राजेश्वर नगरीमध्ये दिनांक 20 डिसेंबर शनिवार रोजी येत असून स्थानिक हॉटेल सिटी स्पोर्ट इथे मोजक्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे अशा संचलन समिती यांच्यासोबत बैठक घेऊन आगामी निवडणुकीची रणनीती चा मंत्र ते देणार आहे.

भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्ष भारतीय नेहमी निवडणुकीची तयारी निवडणुकीची तयारी सिटी स्पोर्ट इथून सुरू करत असते आणि यंदाही राज्याचे महसूल मंत्री आणि निवडणूक प्रभारी माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 156 कार्यकर्त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना ज्यांना निमंत्रण दिले आहे त्यांनाच प्रवेश त्या बैठकीमध्ये देण्यात येणार असून आणि त्यांच्याशी संवाद साधून आगामी निवडणुकी संदर्भातल्या बारकाव्या व अडीअडचणी समजून घेणार असून व पक्षाची भूमिका विषयी माहिती देणार असल्याची माहिती निवडणूक प्रमुख विजय अगरवाल यांनी दिली आहे.

या बैठकीत भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर खासदार अनुप धोत्रे, संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर, ,आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर जयंत मसने, किशोर पाटील, कृष्णा शर्मा यावेळी उपस्थित राहणार आहेत.

नोंदणी आणि निमंत्रित यांना या बैठकीचा प्रवेश देण्यात येणार आहे.

अकोला महानगरपालिकेतील निवडणुकीच्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण बैठक होत असल्याची माहिती विजय अग्रवाल यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande