
अकोला, 19 डिसेंबर (हिं.स.)।
अकोला रेल्वे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश केला आहे. गांधीधाम स्पेशल एक्सप्रेसमध्ये गांजाची वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 16 किलो 417 ग्रॅम गांजा जप्त केला असून एका महिलेसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे सापळा
अकोला रेल्वे पोलिसांना 19 डिसेंबर 2025 रोजी एका गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली होती. ट्रेन क्रमांक 20803 गांधीधाम स्पेशल एक्सप्रेसच्या ए/1 कोचमधून गांजाची तस्करी केली जात असल्याचे समजताच रेल्वे पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे यांनी तात्काळ एक विशेष पथक तयार केले. या पथकाने रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर या ट्रेनची प्रतीक्षा करत कडक बंदोबस्त तैनात केला. दुपारी 12 च्या सुमारास ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच पोलिसांनी ए/1 कोचमध्ये प्रवेश केला. यावेळी बर्थ क्रमांक 1 वर सत्यम प्रफुल पात्रा (वय 26) आणि बर्थ क्रमांक 2 वर पूजा चितरंजन जेना (वय 23) हे दोघे संशयास्पदरीत्या बसलेले आढळले. त्यांच्याकडे असलेल्या मोरपंखी रंगाच्या सॅकबॅग आणि इतर दोन बॅगांची पोलिसांनी विचारपूस केलीमात्र, त्यांनी दिलेल्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पंचांच्या समक्ष बॅगांची झडती घेतली असता, खाकी सेलोटेपने गुंडाळलेले 8 बंडल सापडले. आणि पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले..
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे