भुसावळमध्ये टपरी चालकावर गोळीबार ; एक जण गंभीर
जळगाव, 19 डिसेंबर (हिं.स.) भुसावळ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. दुचाकीवर आलेल्या चौघानी एका टपरीवरील रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला विरोध करून बचावासाठी टपरीचालकाने हल्लेखोरांवर तीक्ष्ण हत्याराने वार केला. प्रत्त्युत्तरात हल्लेख
भुसावळमध्ये टपरी चालकावर गोळीबार ; एक जण गंभीर


जळगाव, 19 डिसेंबर (हिं.स.) भुसावळ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. दुचाकीवर आलेल्या चौघानी एका टपरीवरील रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला विरोध करून बचावासाठी टपरीचालकाने हल्लेखोरांवर तीक्ष्ण हत्याराने वार केला. प्रत्त्युत्तरात हल्लेखोरांनी टपरी चालकावर गोळीबार केल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला.उल्हास गणेश पाटील (वय ३९, रा. जुना सातारा) असं गोळीबार झालेल्या टपरी चालकाचे नाव असून शहरातील जळगाव नाका परिसरात घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.शहरातील जळगाव रोडवरील जुना सातारा भागात खळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवछत्रपती बेंजो ग्रुप फलकाजवळ असलेल्या टपरीवर दुचाकीने तोंडाला रुमाल बांधून चौघे जण आले. त्यांनी त्या टपरीमधील रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. तेथे असलेले उल्हास पाटील यांनी विरोध केला. यात हल्लेखोरांनी पाटील यांच्यावर गोळीबार केला. छातीला गोळी लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव येथे हलवण्यात आले. अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधिक्षक संदीप गावीत आणि फॉरेन्सिक पथकाने यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास सुरु आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande