
रत्नागिरी, 19 डिसेंबर, (हिं. स.) : राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांची रत्नागिरी जिल्हा भाजप सचिव राजू भाटलेकर यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी जिल्ह्यातील काही मुद्द्यांबाबत चर्चा केली.
श्री. भाटलेकर यांनी श्री. शेलार यांना निवेदन सादर केले. गणपतीपुळे येथे कोकणातील समृद्ध कला, लोकसंस्कृती व परंपरा देश–विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना सादर करता याव्यात यासाठी ऑडिटोरियम व सांस्कृतिक केंद्र मंजूर करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
या उपक्रमातून कोकणातील कला पर्यटकांपर्यंत पोहोचेल. तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळणार असून, कलाकारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. कोकणाची सांस्कृतिक ओळख अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी