लखनऊमधील रद्द झालेल्या चौथ्या टी२० सामन्याच्या तिकिटांचे पैसे प्रेक्षकांना परत मिळणार
लखनऊ, 19 डिसेंबर (हिं.स.)।उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (यूपीसीए) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या चौथ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या रद्दीनंतर प्रेक्षकांना तिकीटाची संपूर्ण रक्कम परत करण्याची घोषणा केली आहे. दाट धुके आणि स्
लखनौमधील रद्द झालेल्या चौथ्या टी२० सामन्याच्या तिकिटांचे पैसे प्रेक्षकांना परत मिळणार


लखनऊ, 19 डिसेंबर (हिं.स.)।उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (यूपीसीए) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या चौथ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या रद्दीनंतर प्रेक्षकांना तिकीटाची संपूर्ण रक्कम परत करण्याची घोषणा केली आहे. दाट धुके आणि स्मॉगमुळे लखनऊ येथील एकाना स्टेडियममध्ये हा सामना होऊ शकला नाही.सामन्याची वेळ सायंकाळी 7 वाजता निश्चित होती; मात्र दृश्यता अत्यंत खराब असल्याने पंचांनी सहा वेळा मैदानाची पाहणी केल्यानंतर बुधवारी रात्री सुमारे 9:30 वाजता सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

यूपीसीएचे सचिव प्रेम मनोहर गुप्ता यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, ज्या प्रेक्षकांनी ऑनलाइन तिकीटे बुक केली आहेत, त्यांना तिकीटाची रक्कम त्याच माध्यमातून परत केली जाईल, ज्या माध्यमातून पेमेंट करण्यात आले होते. रिफंडसंदर्भातील माहिती नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवली जाईल. त्यामुळे प्रेक्षकांनी आपल्या ई-मेलवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या प्रेक्षकांनी ऑफलाइन तिकीटे खरेदी केली आहेत, ते 20, 21 आणि 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत एकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या गेट क्रमांक-2 जवळील बॉक्स ऑफिसमधून रिफंड घेऊ शकतात. ऑफलाइन तिकीटधारकांना रिफंडसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक असून, त्यांनी मूळ भौतिक तिकीट तसेच ओळख पडताळणीसाठी शासकीय ओळखपत्राची प्रत सोबत आणणे बंधनकारक आहे.

प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, तिकीटधारकांना बँक तपशीलांसह रिफंड फॉर्म भरून मूळ तिकीट जमा करावे लागेल. कागदपत्रे आणि माहितीची पडताळणी झाल्यानंतरच रिफंड प्रक्रिया सुरू केली जाईल आणि रक्कम थेट संबंधित बँक खात्यात जमा केली जाईल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये धुके इतके दाट होते की हवेत असलेला चेंडू ट्रॅक करणे क्षेत्ररक्षकांसाठी धोकादायक मानले गेले. यामुळे नाणेफेक वारंवार पुढे ढकलावी लागली. पंचांनी एकूण सहा वेळा मैदानाची पाहणी केली; मात्र अखेरीस सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande