
बीड, 19 डिसेंबर (हिं.स.)।विहिरीच्या पाण्यावरून दोन भाऊ एकमेकांना भिडल्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बीड जिल्ह्यातील येवला या गावात घडली. पाणी भरण्यासाठी दोन भाऊ आले परंतु वाद उफाळून आला आणित्यांनी कुऱ्हाड, कत्ती आणि काठीने एकमेकांना मारहाण केल्याने दोघे जण जखमी झाल्याची घटना येवता (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या आठ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
येवता येथील त्यांनी विहिर आमची आहे, तु पाण्याची मोटर चालू करू नकोस असे म्हणत शिवीगाळ करू केली. त्यांना आपण पाणी घेऊ असे म्हणाले असता कुऱ्हाड मारून जखमी केले. तर इतरांनी काठीने व चापटाबुक्याने मारहाण केलीचौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार हनुमान मुंडे हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis