
नाशिक, 19 डिसेंबर (हिं.स.)। कोणीही आरोप करण्यापेक्षा त्याचे पुरावे द्यावे मग सरकार कारवाई करेल असे सांगून राज्याचे जलसंपदा आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की माणिक कोकाटे प्रकरणांमध्ये पुढील चौकशी ह सुरूच राहणार आहे. दोष सिद्ध झाला तर कारवाई अटळ असेल असे स्पष्ट करून नाशिकमध्ये महायुती होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे
पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना सांगितले की,कोकाटे प्रकरणातील निकालाबाबत सर्व विषय सध्या न्यायालयात असून पुढील कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने संबंधितांना सध्या अवधी दिला असून, याआधी मुख्यमंत्री यांनी नियमानुसार कारवाई केली होती. दोन वेळा शिक्षा सुनावल्यानंतर खाते काढून घेण्यात आले आणि नंतर राजीनामा देण्यात आला. नियमाप्रमाणे दोषी ठरलेल्या व्यक्तीला त्या पदावर राहता येत नाही, असे महाजन यांनी सांगितले. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊनच कारवाई करण्यात आली असून अजित पवारही या प्रकरणात लक्ष घालत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले की, आरोप करत असतील तर ठोस पुरावे द्यावेत. पुरावे समोर आले तर शासन कारवाईला मागे-पुढे पाहणार नाही. कोरोना काळातील कामकाजावरही प्रश्न उपस्थित होत असून, दोष सिद्ध झाल्यास कोणालाही मंत्रिमंडळात ठेवले जाणार नाही. मुख्यमंत्री याबाबत कुचराई करणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट करुन पुढे म्हणाले की,वाचाळवीर वक्तव्यांबाबत बोलताना महाजन म्हणाले की, वारंवार प्रोटोकॉल नसलेली भाषा वापरणे योग्य नाही. मंत्री म्हणून प्रत्येकावर जबाबदारी असते आणि तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. याबाबत इतर नेत्यांनीही सूचना दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV