
धुळे, 2 डिसेंबर, (हिं.स.) - धुळे येथील हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा येथे दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी अस्मिता खेलो इंडिया टेनिस बॉल क्रिकेट लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 16 महिला संघ यांनी सहभाग घेतला होता. त्यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल हरणमाळ येथील विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक पटकावून 7000/- रुपये रोख बक्षीस व सन्मानचिन्ह प्राप्त केले.
क्रीडा शिक्षक श्री राजेश मोरे व हेमराज भामरे यांचे विद्यार्थ्यांनींना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यात प्रामुख्याने आरोही नितीन सोनगरे, श्वेता लतेश मोरे , समृद्धी ईश्वर ठाकरे,रिद्धी सुनील उदिकर, श्रद्धा सुनील निकम, प्राजक्ता जितेंद्र पवार,यशस्वी सुनील निकम, साक्षी मनोहर सोनवणे, मनस्वी चंद्रजीत भदाणे, चंदना नितीन वळवी आदी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. संस्थेचे चेअरमन दादासो सुभाषजी देवरे, उपाध्यक्ष विलासजी देवरे, सौ अश्विनीताई देवरे, प्रकल्प समन्वयक एस बी पाटील, प्राचार्य आशिष काटे, समन्वयक नामदेव जगताप तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर