सिलिकॉन व्हॅली ओपन: अनाहत सिंगचे आव्हान संपुष्टात
कॅलिफोर्निया (अमेरिका), 24 ऑक्टोबर (हिं.स.) | रेडवूड सिटी येथे सुरू असलेल्या ''सिलिकॉन व्हॅली ओपन'' स्क्वॅश स्पर्धेत, भारताची उदयोन्मुख स्क्वॅश खेळाडू अनाहत सिंग हिला मलेशियाच्या शिवसंगरी सुब्रमण्यमकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे
अनाहत सिंग


कॅलिफोर्निया (अमेरिका), 24 ऑक्टोबर (हिं.स.) | रेडवूड सिटी येथे सुरू असलेल्या 'सिलिकॉन व्हॅली ओपन' स्क्वॅश स्पर्धेत, भारताची उदयोन्मुख स्क्वॅश खेळाडू अनाहत सिंग हिला मलेशियाच्या शिवसंगरी सुब्रमण्यमकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे अनाहतचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

सामन्याच्या पहिल्या गेममध्ये अनाहतने ११-५ असा विजय मिळवला होता, परंतु त्यानंतर मलेशियन खेळाडू शिवसंगरीने जोरदार पुनरागमन करत सलग तीन गेम जिंकले आणि भारतीय खेळाडूला ३-१ (५-११, ११-६, ११-४, ११-७) अशा फरकाने पराभूत केले. विशेष म्हणजे, जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही (२०२६) महिला एकेरी स्क्वॅश प्रकारात शिवसंगरीनेच अनाहतला सुवर्णपदक जिंकण्यापासून रोखले होते.

उपांत्य फेरीतील विजयानंतर, शिवसंगरीने अनाहतच्या प्रतिभेचे कौतुक केले. तिने अनाहतला एक 'धोकादायक प्रतिस्पर्धी' असे संबोधले आणि सांगितले की, इतक्या कमी वयातही ती अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. शिवसंगरीच्या मते, तिची सुरुवात संथ झाली होती, परंतु अचूकतेमध्ये सुधारणा करून तिने पुन्हा लय मिळवली, ज्यामुळे तिला सामना फिरवण्यात यश आले.

शिवसंगरी म्हणाली, अनाहत अत्यंत प्रतिभावान आणि धोकादायक खेळाडू आहे. ती नक्कीच सध्याच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे, आणि तिचे वयही खूप कमी आहे. आजच्या सामन्यात माझी सुरुवात थोडी संथ झाली होती, पण मी पुन्हा सावरून खेळात परतले. ज्या पद्धतीने मी सामना संपवला, त्याबद्दल मला आनंद आहे. तिच्या खेळात ओढले जाणे सोपे असते; हा सामना 'कोण सर्वोत्तम फटका मारते' अशा प्रकारचा नव्हता, तर मला माझी अचूकता शोधणे गरजेचे होते. एकदा का मला ती अचूकता सापडली, की खेळाचे चित्रच बदलले. काही गोष्टी मी अधिक चांगल्या प्रकारे करू शकले असते, पण एकूणच माझ्या कामगिरीवर मी समाधानी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande