
कोल्हापूर, 2 डिसेंबर (हिं.स.)।जिल्हा बालविकास प्रकल्प विभागाकडेचाईल्ड हेल्पलाईन 109 या टोल फ्री क्रमांकावर मिळालेल्या माहितीनुसारविक्रमनगर येथे एका अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह खास पथकाने रोखला. संबधित मुलीला बाल सुधार गृहात दाखल करण्यात आले. 2 डिसेंबर रोजी अल्पवयीन बालिका वय 17 वर्षे 1 माहिने रा. विक्रमनगर, ता.करवीर, जि. कोल्हापूर हिचा बाल विवाह किरण सावळू बागडी, मु.पो. दडडी मुदगे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव वय 25 वर्षे याच्या सोबत सायंकाळी 5 वाजता त्र्यंबोली हॉल, विक्रमनगर येथे बाल विवाह होणार असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती.
त्यानुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी निवेदिता महाडिक, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील महेंद्र कांबळे, अभिजित पाटील, अंगणवाडी सेविका गायत्री कुराडे व वैशाली कांबळे यांचा समावेश असलेल्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. बालिकेच्या जन्म दाखल्याच्या नोंदणीनुसार वयाची शहानिशा केली. यावेळी संबधित वधु अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हा बाल विवाह रोखण्यात आला.
अल्पवयीन बालिका बाल कल्याण समिती समोर सादर करून बालिकेस बालगृहात दाखल करण्यात आले. या प्रकरणी एस.एस. वाईगडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, श्रीम. अश्विनी खाडे व श्रीम. पद्मजा गारे सदस्या, बाल कल्याण समिती, एस. एन. दाते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar