
नवी दिल्ली, 20 डिसेंबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) स्थापना दिनानिमित्त संस्थेशी संबंधित सर्व जवानांना, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सशस्त्र सीमा बलाचे अजोड समर्पण, सेवेच्या सर्वोच्च परंपरांचे प्रतिबिंब आहे आणि त्यांची कर्तव्यनिष्ठा देशाच्या सुरक्षेचा एक मजबूत आधारस्तंभ आहे. आव्हानात्मक भूप्रदेशांपासून ते कठीण परिचालन परिस्थितीपर्यंत, एसएसबी नेहमीच सतर्क असते, असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे.
आपल्या '' पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले की, “सशस्त्र सीमा बलाच्या स्थापना दिनानिमित्त, मी या दलाशी संबंधित सर्व जवानांना माझ्या शुभेच्छा देतो. एसएसबीचे निस्सीम समर्पण, सेवेच्या सर्वोच्च परंपरांचे प्रतीक आहे. त्यांची कर्तव्यनिष्ठा आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेचा एक मजबूत आधारस्तंभ आहे. आव्हानात्मक भूप्रदेशांपासून ते कठीण परिचालन परिस्थितीपर्यंत, एसएसबी नेहमीच सतर्क असते. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
आपल्या एक्स’वरील एका पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “सशस्त्र सीमा बलाच्या स्थापना दिनानिमित्त एसएसबीच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा. आपल्या सीमांचे रक्षण करण्यापासून ते संकटाच्या काळात नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्यापर्यंत, सशस्त्र सीमा बलाने (एसएसबी) नेहमीच देशाला अभिमान वाटावा असे कार्य केले आहे. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना माझे विनम्र अभिवादन.” स्थापना दिनानिमित्त एसएसबीच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule