पुणे विद्यापीठात सर्वसमावेशक स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न
पुणे, 21 डिसेंबर (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. मा. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली
पुणे विद्यापीठात सर्वसमावेशक स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न


पुणे, 21 डिसेंबर (हिं.स.)।

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. मा. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्र - कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या उपस्थितीत हे अभियान रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता पार पडले.

या अभियानाअंतर्गत विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय इमारती, रस्ते, बागा तसेच सार्वजनिक जागांची स्वच्छता करण्यात आली. प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे यांनी प्रशासनाच्या वतीने विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. स्वच्छतेबरोबरच पर्यावरण जतन व सामाजिक जबाबदारीचे भान निर्माण करण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरले.

स्वच्छ परिसर हीच सुदृढ शैक्षणिक वातावरणाची पहिली पायरी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे विद्यापीठ परिसर अधिक स्वच्छ, नीटनेटका व आकर्षक झाल्याचे चित्र दिसून आले

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande