'इन्कलाब सेवा समिती'च्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
अकोला, 22 डिसेंबर (हिं.स.)। आजच्या काळात कौटुंबिक समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून प्रत्येक वेळेस न्यायालयात प्रकरण नेणे हे परवडणारे नसते. अशा वेळेस ''इन्कलाब सेवा समिती'' ही स्वयंसेवी संस्था 2013 पासून कौटुंबिक वाद सामोपचाराने सोडवण्यास प्रयत
P


अकोला, 22 डिसेंबर (हिं.स.)।

आजच्या काळात कौटुंबिक समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून प्रत्येक वेळेस न्यायालयात प्रकरण नेणे हे परवडणारे नसते. अशा वेळेस 'इन्कलाब सेवा समिती' ही स्वयंसेवी संस्था 2013 पासून कौटुंबिक वाद सामोपचाराने सोडवण्यास प्रयत्न करीत आहे.

स्थानिक स्वराज्य भवन अकोला, येथे निखीलेश दिवेकर यांच्यातर्फे मोहम्मद एजाज, अध्यक्ष इन्कलाब सेवा समिती यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या समिती जवळ दररोज चार ते पाच केसेस निवाड्यासाठी येत असतात. यामध्ये महिलेच्या पोटगी संबंधी समस्या असते तर कधी मुलांचा ताबा बद्दल समस्या, तर कधी हुंडा संबंधी वाद. जर का कोणते प्रकरण न्यायालयात गेलेच तर शोषित महिलेला सरकारी वकील देखील पुरवण्यात संस्था मदत करते. सर्वात महत्त्वाचे की ही सर्व प्रकरणे सदर संस्थेतर्फे निशुल्क सोडविल्या जातात व दोन्हीकडच्या नातेवाईकांना (पती-पत्नी) कोणताही खर्च लागत नाही. आत्तापर्यंत यांनी दहा हजारच्या वर प्रकरणे हाताळली आहेत. या समितीचे ऑफिस आरपीटीएस रोड जुने शहर येथे आहे. तरी या एनजीओच्या निस्वार्थ सेवा बघून यांचा सत्कार करण्यात आला.

या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांपैकी शेख लतीफ, सय्यद शाकीर, मोहम्मद साबीर, आलिम नुरुद्दीन, कारी मोहसीन रजा, ऍड. राजेश खोब्रागडे, बादशाह पारोचे, नसिर खान, जफर अन्सारी यांचा सत्कार करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande