जळगावात ७७व्या वर्षी नशिराबादच्या आजीबाईंचा ऐतिहासिक विजय
जळगाव, 22 डिसेंबर (हिं.स.) | नशिराबाद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चुरशीची ठरली, परंतु याहूनही अधिक चर्चा वयाच्या ७७ व्या वर्षी राजकारणात पदार्पण करून विजय मिळवणाऱ्या आजीबाई जनाबाई रंधे यांची होत आहे. विशेषतः ज्या वयात अनेकजण निवृत्त आयुष्याचा
७७व्या वर्षी


जळगाव, 22 डिसेंबर (हिं.स.) | नशिराबाद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चुरशीची ठरली, परंतु याहूनही अधिक चर्चा वयाच्या ७७ व्या वर्षी राजकारणात पदार्पण करून विजय मिळवणाऱ्या आजीबाई जनाबाई रंधे यांची होत आहे. विशेषतः ज्या वयात अनेकजण निवृत्त आयुष्याचा विचार करतात, त्या वयात जनाबाई रंधे यांनी नगरपंचायत निवडणुकीत विजय मिळवत इतिहास घडवला आहे.

नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ ‘अ’ मधून भाजपकडून निवडणूक लढवलेल्या जनाबाई रंधे यांनी कडक उन्हात, पायात चप्पलही न घालता प्रचार केला. ना हातात काठी, ना शरीराची तक्रार. खरं तर तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा उत्साह पाहून मतदार प्रभावित झाले. घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला आणि विकासाची ग्वाही दिली. मतमोजणीदरम्यान जनाबाई रंधे विजयी झाल्याची घोषणा होताच त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

नगरपंचायत प्रांगणात कार्यकर्ते आणि नातेवाईकांची गळाभेट घेताना त्या भावुक झाल्या. हा क्षण पाहून उपस्थितांनाही भावना अनावर झाल्या. विशेषतः ज्या वयात अनेकजण निवृत्तीचा मार्ग स्वीकारतात, त्या वयात जनाबाईंनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.त्यांचा हा विजय म्हणजे केवळ एका प्रभागाचा नव्हे, तर आत्मविश्वास, जिद्द आणि जनतेच्या प्रेमाचा विजय असल्याचे बोलले जात आहे. आज जनाबाई रंधे या केवळ नगरसेवक नाहीत, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande