बालविवाहमुक्त अभियानात ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा
अकोला, 24 डिसेंबर (हिं.स.)। अकोला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्यातर्फे कर्मचारी भवन येथे ग्रामपंचायत अधिकारी यांचे 100 दिवशीय बालविवाह मुक्त अभियान अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा
Photo


अकोला, 24 डिसेंबर (हिं.स.)। अकोला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्यातर्फे कर्मचारी भवन येथे ग्रामपंचायत अधिकारी यांचे 100 दिवशीय बालविवाह मुक्त अभियान अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य संजय सेंगर हे होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ऍड. अनिता गुरव अध्यक्षा बाल कल्याण समिती यांनी भूषविले. तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून चक्रनारायण सर आणि अनिल राऊत सर उपस्थित होते. तसेच बाल न्याय मंडळाच्या सदस्या सारिका घिरणीकर व बाल कल्याण समितीचे सदस्य राजेश देशमुख, शीला तोष्णीवाल उपस्थित होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी जिल्ह्यात राबवित असलेल्या शंभर दिवसाच्या बालविवाह विरोधी अभियाना विषयी माहिती सांगितली.

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बालविवाहाचे प्रमाण शून्य व्हावे. तसेच बालविवाह झाल्यास ताबडतोब योग्य ती कार्यवाही करावी. बालविवाह होऊ नयेत यासाठी बालविवाहाच्या बाबतीत योग्य ती जबाबदारी पार पाडावी असे सांगितले. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करावे व सेमिनार राबवावेत असे सांगितले.

बालविवाह हा एक अतिसंवेदनशील विषय आहे त्याकरिता सर्वांनी अतिशय जोमाने कार्य करावे हे सांगितले, महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे माजी सदस्य मा. ऍड.श्री संजय सेंगर सर यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 याविषयी सविस्तर माहिती दिली बालविवाहाचे दुष्परिणाम सांगितले, बालविवाहाची माहिती मिळताच, किंवा बालविवाह झाल्यास योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे असे मार्गदर्शनामध्ये सांगितले. मा. अध्यक्ष बालकल्याण समिती अकोला ऍड. अनिता गुरव यांनी बालविवाह विरोधी कायदा विषयी माहिती सांगितली. यशदाचे मास्टर ट्रेनर मा. संतोष चक्रनारायण बालकांचे अधिकार , आणि बालविवाह याविषयी माहिती दिली. तसेच यशदा से मास्टर ट्रेनर अनिल राऊत यांनी नशा रोखण्याकरिता काय करावे याविषयी सांगितले उपस्थितांना बालविवाह विरोधी शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन चाइल्ड हेल्पलाइनच्या समन्वयक हर्षाली उमाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी राजू लाडूलकर यांनी केले. सदर कार्यशाळेला 380 ते 400 ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता महिला व बाल विकास अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष चे सुनील सरकटे, सचिन घाटे, सतीश राठोड, रेश्मा मुरूमकार , चाइल्ड हेल्पलाइन 1098 विद्या उंबरकर, राजेश मनवर, वैभव भदे, शरयू तळेगावकर, विपला फाउंडेशनच्या धर्माळे, ISWS चे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे, राजश्री कीर्तीवार यांनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande