
परभणी, 24 डिसेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार नुकतीच काँग्रेसच्या महानगर पालिका स्टार प्रचारकाची यादी जाहीर करण्यात आली आहे. आगामी १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यात बृहन्मुंबई सह २९ महानगर पालिकेच्या निवडणुका होणार असून या अनुषंगाने निवडणुक प्रचारासाठी सिद्धार्थ हत्तीअंबिरे (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु.जाती विभाग) यांची मनपा निवडणूक स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली आहे. सदर निवड यादी जाहीर करण्यात आली असून या यादीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी यांचा समावेश आहे. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुक प्रचारार्थ सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी आपली भूमिका बजावली आहे. महानगर पालिका स्टार प्रचारक पदी सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची निवड झाल्याबद्दल राजकीय सामाजिक क्षेत्रातून विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis