परभणीत चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात
परभणी, 24 डिसेंबर (हिं.स.)। पाथरी पोलीस ठाण्यात दाखल चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने नुकत्याच केलेल्या कारवाईत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाथरी पोलीस ठाण्यात गुरनं ३६०/२०२५ मध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३३१ (४) प्रमा
परभणीत चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात


परभणी, 24 डिसेंबर (हिं.स.)। पाथरी पोलीस ठाण्यात दाखल चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने नुकत्याच केलेल्या कारवाईत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाथरी पोलीस ठाण्यात गुरनं ३६०/२०२५ मध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३३१ (४) प्रमाणे चोरीचा गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणाच्या तपासाठी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात व अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकांनद पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक जगताप, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चट्टे, केंद्रे, भुजबळ, सातपुते, चाटे, चव्हाण, डुबे, ढवळे, पौळ यांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. पथक आरोपींचा शोध घेत आसतांना प्रकरणातील आरोपी विशाल वसंतराव दुधाटे रा. ज्ञानेश्वरनगर पाथरी याने हा गुन्हा केल्याचे समोर आले. त्याचा शोध घेतला असता तो सेलू ते पाथरी रोडवरील साखर कारखाना परीसरात वावरत असल्याच्या माहीतीवरून संबंधित ठिकाणी जावुन सापळा लावुन पथकाने कारवाई केली. आरोपीस साखर कारखाना परिसरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने त्याचे नाव विशाल वसंतराव दुधाटे असे सांगितले. तसेच सहकारी गणेश शिंदे, गजानन शिंदे, आयान यांनी मिळून केल्याचे पुढे आले. चौकशी दरम्यान गुन्हयातील एकुण रक्कमेपैकी त्याचे हिशाला आलेले १० हजार रूपये त्याने त्याचे जवळून काढुन दिले. या आरोपीस पुढील कारवाईसाठी आरोपीला पाथरी पोलिसांच्या स्वाधीन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande