लातूर एमआयडीसीत १२ बुलेट दुचाकींवर कारवाई, लाखांचा दंड वसूल
लातूर, 28 डिसेंबर (हिं.स.)। फटाका सायलेन्सरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर एमआयडीसी पोलिसांची ठोस कारवाई, १२ मॉडीफाय बुलेट दुचाकींवर कारवाई. ९९,५००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लातूर शहरातील सार्वजनिक शांतता, नागरिकांचे आरोग्य तस
फटाका सायलेन्सरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर एमआयडीसी पोलिसांची ठोस कारवाई, १२ मॉडीफाय बुलेट दुचाकींवर कारवाई. ९९,५००/- रुपयांचा दंड वसूल.


लातूर, 28 डिसेंबर (हिं.स.)।

फटाका सायलेन्सरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर एमआयडीसी पोलिसांची ठोस कारवाई, १२ मॉडीफाय बुलेट दुचाकींवर कारवाई. ९९,५००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

लातूर शहरातील सार्वजनिक शांतता, नागरिकांचे आरोग्य तसेच पर्यावरणाचे संरक्षण या अनुषंगाने लातूर पोलीस प्रशासनाकडून सातत्याने प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहरात वाढत असलेल्या फटाका सायलेन्सर लावलेल्या बुलेट मोटारसायकलींमुळे होणारे प्रचंड ध्वनी प्रदूषण, नागरिकांची होणारी गैरसोय, रुग्ण, वृद्ध, लहान मुले व विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण तसेच कायदा व सुव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन, लातूर यांच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरापर्यंत फटाका सायलेन्सर वाजवत, रस्त्यावरून बेदरकारपणे फिरून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या, नागरिकांना त्रास देणाऱ्या व शहरातील वातावरण दूषित करणाऱ्या बुलेट दुचाकी वाहनांविरोधात एमआयडीसी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. या मोहिमेदरम्यान एकूण १२ बुलेट मोटारसायकली ज्या बेकायदेशीररित्या मॉडीफाय करून फटाका सायलेन्सर बसवून वापरण्यात येत होत्या, त्या ताब्यात घेण्यात आल्या. सदर सर्व दुचाकी वाहने एमआयडीसी पोलीस ठाण्यात डिटेन करून त्या मोटार वाहन कायदा तसेच ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे स्पष्ट झाल्याने १२ वाहनांवर एकूण ९९,५००/- रुपये इतक्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनचालकांकडून दंडाची रक्कम वसूल करून, सदर फटाका सायलेन्सर काढून घेण्यात आले असून त्यानंतर वाहने संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आली.

ही संपूर्ण कारवाई श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर, श्री. मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर, तसेच श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande