परभणी - पोलिस वसाहतीत ठाणेदाराचे एकटेच कुटुंब पाहुन एसपींनी घेतली आस्थेवाईक भेट
परभणी, 28 डिसेंबर (हिं.स.)। ताडकळस पोलिस ठाणे परिसरात रात्री गस्तीवर असताना ताडकळस येथील नाकाबंदी ठिकाणेस, तसेच पोलिस ठाणे परिसराची पाहणी करताना ताडकळस पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन मोरे हे सहकुटुंब पोलिस वसाहतीत एकटेच राहात असल्याची माहिती मिळताच
पोलिस वसाहतीत ठाणेदाराचे एकटेच कुटुंब पाहुन पोलिस अधिक्षकांनी घेतली आस्थेवाईक भेट


परभणी, 28 डिसेंबर (हिं.स.)।

ताडकळस पोलिस ठाणे परिसरात रात्री गस्तीवर असताना ताडकळस येथील नाकाबंदी ठिकाणेस, तसेच पोलिस ठाणे परिसराची पाहणी करताना ताडकळस पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन मोरे हे सहकुटुंब पोलिस वसाहतीत एकटेच राहात असल्याची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी ठाणेदार गजानन मोरे यांच्या शासकीय कॉर्टरला भेट देऊन ठाणेदार गजानन मोरे यांची सहकुटुंब भेट घेऊन आस्थेवाईक चौकशी केली.पोलिस दलास आपले कुटुंब समजून त्यांची काळजी घेणारे पोलिस अधिक्षक म्हणून श्री परदेशी यांचा मानवीय चेहरा पुढे आला. या भेटी दरम्यान पोलिस अधिक्षक परदेशी यांनी बाजेवर बसून शेकोटीचा आनंद घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत वडीलकीचे आशिर्वाद दिले तसेच मोरे कुटुंबियांचे मनोबल वाढविले. पोलिस अधिक्षक सारख्या मोठ्या पदावर असूनही परदेशी यांनी कोणताही बडेजावपणा न करता ठाणेदाराच्या कुटुंबियांना आपला अमूल्य वेळ देऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केल्याबद्दल ठाणेदार गजानन मोरे यांनी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी यांनी देखील असे कुटुंबवत्सल पोलिस अधिक्षक लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande