महाराष्ट्रात 24 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची सेवा सुरू
-प्रमुख शहरांमध्ये रेल्वे जोडणीला नवी गती नवी दिल्ली, 3 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यांच्या आणि लोकसभा मतदारसंघांच्या सीमांपलीकडे (म्हणजे एका राज्याची किंवा मतदारसंघाची सीमा ओलांडून दुसऱ्या भागात जाणे) गाड्या चालवते आ
Vande Bharat Express trains


-प्रमुख शहरांमध्ये रेल्वे जोडणीला नवी गती

नवी दिल्ली, 3 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यांच्या आणि लोकसभा मतदारसंघांच्या सीमांपलीकडे (म्हणजे एका राज्याची किंवा मतदारसंघाची सीमा ओलांडून दुसऱ्या भागात जाणे) गाड्या चालवते आणि नवीन गाड्या सुरू करते. त्यामुळे सलग प्रवास करणे अधिक सुकर झाले आहे. सध्या भारतीय रेल्वे देशभरात 164 वंदे भारत गाड्या चालवत आहे. यापैकी 24 वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्र राज्यातील स्थानकांना सेवा पुरवतात.

या गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

26101/26102 पुणे - अजनी वंदे भारत एक्सप्रेस – 11-08-2025 रोजी सुरू, आठवड्यातून 6 दिवस.

20101/20102 नागपूर – सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस – 19-09-2024 रोजी सुरू, आठवड्यातून 6 दिवस.

20669/20670 हुबळी – पुणे वंदे भारत एक्सप्रेस – 18-09-2024 रोजी सुरू, आठवड्यातून 3 दिवस.

20673/20674 कोल्हापूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेस– 18-09-2024 रोजी सुरू, आठवड्यातून 3 दिवस.

22961/22962 मुंबई सेंट्रल – अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस– 09-03-2024 रोजी सुरू, आठवड्यातून 6 दिवस.

20705/20706 नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस– 30-12-2023 रोजी सुरू, आठवड्यातून 6 दिवस.

22229/22230 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस – 28-06-2023 रोजी सुरू, आठवड्यातून 6 दिवस.

20911/20912 इंदूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस – 27-06-2023 रोजी सुरू, आठवड्यातून 6 दिवस.

22223/22224 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस – 11-02-2023 रोजी सुरू, आठवड्यातून 6 दिवस.

22225/22226 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस – 11-02-2023 रोजी सुरू, आठवड्यातून 6 दिवस.

20825/20826 बिलासपूर - नागपूर वंदे भारत एक्सप्रेस – 12-12-2022 रोजी सुरू, आठवड्यातून 6 दिवस.

20901/20902 मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस – 30-09-2022 रोजी सुरू, आठवड्यातून 6 दिवस.

परभणीतील प्रवाशांच्या सोयीसाठी 20705/20706 जालना - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार 28-08-2025 पासून परभणीमार्गे नांदेडपर्यंत करण्यात आला आहे.

नवीन गाड्या आणि वंदे भारत सेवा सुरू करायच्या असतील तर रेल्वेकडे पुरेशी जागा, गाड्या धावण्यासाठी मार्ग, डबे, योग्य पायाभूत सुविधा आणि देखभाल करण्याची सोय असणे आवश्यक आहे. रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका अतारांकीत प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande